Mumbai : मुंबई विमानतळाची शान परतली, कोरोना काळानंतर 9 महिन्यांत 146 टक्के वाढीची नोंद
Mumbai : मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत 76 टक्क्यांपर्यंतची घट झाली होती. पण, यावर्षी हे विमानतळ पुन्हा एकदा सर्वात जास्त भारतातील प्रवाशांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे.
Mumbai : कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका मुंबई विमानतळाला बसला होता. मात्र, आता 2021-22 या आर्थिक वर्षात विमानतळ पुन्हा आकाशात भरारी घेण्यास सज्ज झाले आहे. भारतीय विमानतळाबद्दल बोलायचे झाले, तर मुंबई विमानतळावर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत 76 टक्क्यांपर्यंत घट झाली होती. पण, यावर्षी हे विमानतळ पुन्हा एकदा सर्वात जास्त भारतीयांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे.
2021 रोजी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान, मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत 146 टक्के आणि उड्डाणांच्या संख्येत 98 टक्के वाढ नोंदवली गेली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (airport authority of india) म्हणण्यानुसार, भारतीय विमानतळांमधील ही सर्वाधिक वाढ आहे. तर, 2020 मध्ये मात्र परिस्थिती याच्या विरूद्ध होती. 2020 मध्ये 25 मे रोजी विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले.
दोन महिन्यांच्या कडक बंदीनंतर तब्बल अडीच महिन्यांनी विमानतळ देशांतर्गत (domestic) प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध लादले होते. जे जवळपास वर्षभर सुरूच होते. एप्रिल 2020 ते मार्च 2021 दरम्यान, मोजक्याच प्रवाशांनी प्रवास केला. तर 2019-20 मध्ये ते सुमारे 4.5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. त्या काळात त्यात सुमारे 76 टक्के घट नोंदवली गेली. तर दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये ही घसरण 63 ते 66 टक्क्यांच्या दरम्यान नोंदवण्यात आली.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (Mumbai International Airport limited) प्रवक्त्यांनी असं सांगितलं की, “2021 हे वर्ष विमान वाहतूक उद्योगासाठी गेम चेंजर ठरले आहे. मुंबई विमानतळाचे टर्मिनल 1 ऑक्टोबर 2021 मध्ये उघडण्यात आले. विमानतळावर एका दिवसात एक लाख प्रवाशांची नोंद झाली आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai Unlock : मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली; समुद्र किनारे, गार्डन, पार्क, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू
- Maharashtra Corona Guidelines : आजपासून राज्यातील निर्बंध शिथील; काय सुरु, काय बंद?
- New Corona Guidelines : राज्यासह मुंबईतही कोरोना निर्बंध शिथील; पाहा काय सुरु, काय बंद?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha