Mumbai Unlock : मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली; समुद्र किनारे, गार्डन, पार्क, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू
Mumbai New Corona Guidelines : कोरोना नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
मुंबई : संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रग्णसंख्या घटल्यानं मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.
ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?
- पर्यटनस्थळे, आठवडी बाजार, समुद्रकिनारे, गार्डन, पार्क सुरु राहणार
- अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील.
- हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची 50 टक्के क्षमतेनं सुरु
- लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी
- भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना 50 क्षमतेनं परवानगी
महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबई पालिका प्रभाग रचनेत घोळ, वाॅर्ड नियमबाह्य तोडल्याने भाजपा न्यायालयात जाणार, मनपा अधिकार्यांवर कारवाईची मागणी
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद कायम, प्रकल्पग्रस्त पुन्हा करणार एल्गार, काम देखील बंद पाडणार
- नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम, आता बसमध्येही ग्रंथालयाची सुविधा
- पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज