धक्कादायक! सुट्टी म्हणून पोहायला गेले, पाण्याने भरलेल्या तळ्याने केला घात, तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
भिंवडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिन्ही चिमुकले पोहण्यासाठी गेले होते.
![धक्कादायक! सुट्टी म्हणून पोहायला गेले, पाण्याने भरलेल्या तळ्याने केला घात, तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत bhiwandi three children drowned in lake who went for swimming धक्कादायक! सुट्टी म्हणून पोहायला गेले, पाण्याने भरलेल्या तळ्याने केला घात, तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/3c481a35ce9a09c145fbe77b7ea3cbb71732268310122988_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : भिवंडी येथील वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. साहील पीर मोहम्मद शेख (वय 13), गुलाम मुस्तफा मन्नान अन्सारी (वय 14), आणि दिलबर रजा सनसुलहक अन्सारी (वय 11) असे या तीन मृत मुलांची नावे आहेत. तलावात बुडाल्यानंतर या तिन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर या तिन्ही मुलांचे मृततेद तलावातून बाहेर काढण्यात आले.
बराच वेळ शोधल्यानंतर मुलं सापडलीच नाही
मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. याच सुट्टीचा फायदा घेत ही तिन्ही मुले तिघे घरातून बाहेर पडले होते. मात्र उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यानंतर घाबरून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेऊनही मुलांचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी शेवटी गुरुवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार नोंदवली गेली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. अग्निशामक दलानेही तलावात शोध मोहीम चालू केली.
आज दुपारी पुन्हा शोधमोहीम
बराच वेळ शोध घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी गुलाम या मृतदेह सापडला. त्यानंतर रात्री साहीलचाही मृतदेह मिळाला. दिलबर या छोट्या मुलाचा मृत्यू रात्रभर सापडला नव्हता. शेवटी शोध घेतल्यानंतर आज (22 नोव्हेंबर) दुपारी दिलबरचा मृतदेह सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)