एक्स्प्लोर

आधी पत्नीला मिठी मारली, मग धावत्या लोकल ट्रेनमध्ये ढकलून दिलं; मुंबईतील घटना

धावत्या लोकल ट्रेनमधून पत्नीला ढकलून दिल्याची घटना मुंबईत घडली आहे. आरोपीने आधी धावत्या लोकल ट्रेनमध्ये पत्नीला मिठी मारली आणि मग तिला ट्रेनमधून ढकलून दिलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमधून पत्नीला ढकलून दिल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेत संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपीने आधी धावत्या लोकल ट्रेनमध्ये पत्नीला मिठी मारली आणि मग तिला ट्रेनमधून ढकलून दिलं. लोकलच्या हार्बर मार्गावरील चेंबूर आणि गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी महिलेचा पती अनवर अली शेखला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने हे कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दीडच महिन्यांपूर्वी अनवरचा पूनम चव्हाण हिच्याशी विवाह झाला होता. हे दोघेही बेरोजगार होते. हे दोघे सोमवारी (11 जानेवारी) मस्जिद बंदरवरुन आपल्या नातेवाईकांना भेटून पुन्हा मानखुर्दला लोकल ट्रेनमधून येत होते. यावेळी अनवरने आधी पूनमला मिठी मारली आणि नंतर चेंबूर स्थानक सोडल्यावर भरधाव लोकलमधून तिला रुळावर ढकलून दिले.

ही घटना लोकलमध्ये असलेल्या संगीता भालेराव या महिलेने पाहिली आणि त्यांनी तात्काळ गोवंडी रेल्वे स्थानकात असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रेल्वे स्थानकातच अनवरला ताब्यात घेतले आणि रेल्वे रुळावर शोध घेतला असता त्याची पत्नी चेंबूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर मृत अवस्थेत आढळून आली.

या प्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अनवरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दारुच्या नशेत ही त्याने आपल्या पत्नीची हत्या केली असा अंदाज पोलिसांना असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget