Mumbai: शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा दुर्देवी मृत्यू; मुंबईच्या मालाड येथील धक्कादायक घटना
Mumbai: एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा शाळेतील लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

Mumbai: एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा शाळेतील लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मालाड (Malad) पश्चिमेत चिंचोली पाठक (Chincholi Bunder) जवळ असलेला सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये (St Mary’s English High School) काल दुपारी (शुक्रवारी, 16 सप्टेंबर) दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर मुंबईत खळबळ उडाली आहे.
जेनेली फर्नांडिस (वय, 26) असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. फर्नांडिस या जून-2022 पासून सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. दरम्यान, जेनेली फर्नांडिस या काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तांत्रिक बिघाडामुळं दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेनं जाऊ लागली. लिफ्टमध्यं अडकल्यानं जेनेली या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर फर्नांडिस यांना तात्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मालाड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केलीय.
मालाड पोलिसांचं स्पष्टीकरण
मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अदाणे म्हणाले की, “ मृत जेनेली फर्नांडिस यांनी लिफ्टमध्ये पाय ठेवला असता लिफ्टनं त्यांना सातव्या मजल्याकडं ओढलं. लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकल्यानं जेनेली फर्नांडिस यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्यांनी मदतीसाठी केलेला आरडाओरडा ऐकून शाळेतील कर्मचारी आणि मुलं घटनास्थळी धावून गेले. त्यानंतर जेनेली फर्नांडिस यांना जवळच्या नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं."
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
या प्रकरणी पोलीस लिफ्टची देखभाल करणाऱ्या एजन्सीची चौकशी करण्याची शक्यता आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला की, यात कुणाचा निष्काळजीपणा याबबत चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळं या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय . तसेच या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
हे देखील वाचा-
- Navi Mumbai : विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकाला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा; नवी मुंबई जिल्हा न्यायालयाचा निर्णय
- Pandharpur News : वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, पंढरपूरमधील पुराचा धोका टळला, मात्र, व्यास नारायण झोपडपट्टीत शिरणार पाणी
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News





















