एक्स्प्लोर
Advertisement
मुलुंड ATM फसवणूक: रोमानियन नागरिकासह चौघांना दिल्लीत अटक
नवघर पोलिसांनी दिल्लीतून चार जणांना अटक केली आहे.
मुंबई: मुलुंडमधील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम घोटाळ्याप्रकरणी नवघर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद केली आहे.
नवघर पोलिसांनी दिल्लीतून चार जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन रोमानियन आणि दोन भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गेले काही दिवस नवघर पोलीस दिल्लीत तळ ठोकून होते. दिल्लीतील ही टोळी एटीएमचे क्लोनिंग करुन, पैसे लुटत असे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुलुंड पूर्वेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढलेल्या जवळपास 43 जणांना लाखो रुपयांचा फटका बसला.
एटीएममधून पैसे काढून गेल्यानंतर, एसएमएस आला. पण त्यानंतरही चार-पाच तासांनी पुन्हा अकाऊंटमधून पैसे गेल्याचं समोर आलं. हा प्रकार एक-दोघांबाबत घडला नाही, तर तब्बल 43 जणांना याचा फटका बसला आहे.
17 आणि 18 डिसेंबर दरम्यान अनेकांना हा फटका बसल्याने, पीडितांनी नवघर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, आता त्याचा तपास केला आहे.
संबंधित बातम्या
मुलुंडमधील ATM चा घोळ, अकाऊंटमधून लाखो रुपये गायब
एटीएम फोडताना पोलिस आले, चोरटे रंगेहाथ पकडले!
यूट्यूब व्हिडिओ पाहून नाशिकमध्ये एटीएमवर दरोडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement