एक्स्प्लोर
Advertisement
Antilia Bomb Scare: अंबानींच्या घराबाहेरील 'ती' कार चोरीची; पोलीस तपासात समोर आलेल्या 10 गोष्टी
Mukesh Ambani House Antilia Bomb Scare : अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या सापडल्या आहेत.
मुंबई : मुकेश अंबानी यांचं मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी अंबाना कुटुंबाला देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या सापडल्या आहेत.
पोलीस तपासात समोर आलेल्या 10 गोष्टी
- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पियो कार आठवडाभरापूर्वी विक्रोळी येथून चोरीला गेली होती. या गाडीच्या चोरीची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
- गाडीमध्ये काही बनावट नंबर प्लेट्सही आढळल्या आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये एकूण चार नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. यापैकी एक नंबर प्लेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने रजिस्टर आहे.
- याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे.
- मागील एका महिन्यापासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी केली जात होती, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
- पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये एक चिट्ठी देखील सापडली आहे. बॅगवर 'मुंबई इंडियन्स' अलं लिहिलं आहे.
- चिठ्ठीत लिहिलं की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.
- परवा (24 फेब्रुवारी) रात्री 1 वाजता ही स्कॉर्पिओ कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर पार्क करण्यात आली होती.
- हीच स्कॉर्पिओ कार त्याच रात्री 12.40 वाजता हाजी अली जंक्शन जवळ असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं आहे. 10 मिनिट ही गाडी तेथे उभी होती.
- गाडी अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये म्हणून चालक गाडीच्या मागच्या दरवाजाने फरार झाला.
- मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथकं तैनात केली आहे. सध्या नऊ जणांची चौकशी देखील सुरु आहे.
संबंधित बातम्या
- Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली!
- In Pics : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं कशी आली? 'त्या' गाडीत आढळल्या बनावट नंबर प्लेट्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement