एक्स्प्लोर

एक, दोन नाही, तर तब्बल 5 ईमेल; मुकेश अंबानींना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं सत्र सुरूच, पोलिसांच्या हाती अद्याप काहीच नाही

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना पुन्हा आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये गांभीर्यानं घेत नसल्यानं आता परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा मुकेश अंबानींना पुन्हा आलेल्या दोन ईमेलमधून देण्यात आला आहे.

Death Threat to Mukesh Ambani : भारतातीय प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं (Threat Email) सत्र काही थांबायचं नाव घेईना. मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधींच्या खंडणीची मागणी करणारे तब्बल 5 ईमेल आले आहेत. यापूर्वी मुकेश अंबानींना धमकीचे एकापाठोपाठ एक असेल तीन ईमेल आले होते. त्यानंतर पुन्हा मुकेश अंबानींना आणखी दोन ईमेल आले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून अंबानींना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचा कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, अजून काही त्याचा पत्ता लागत नाही. 

मुकेश अंबानींना पुन्हा आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये गांभीर्यानं घेत नसल्यानं आता परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा मुकेश अंबानींना पुन्हा आलेल्या दोन ईमेलमधून देण्यात आला आहे. अशातच आता मुकेश अंबानींना आलेल्या धमकीच्या मेलची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांना येणारं धमकीच्या मेलचे सत्र सुरूच आहे. अशातच हे धमकीचे ईमेल बेल्जियम स्थित फेन्स मेल या कंपनीच्या सुविधेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.

27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या ईमेल अकाऊंटवर एक मेल आला होता. ज्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत, तर आपला जीव गमवावा लागेल, असं म्हटलं होतं. तो ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पहिल्यांदा आरोपीनं 20 कोटी तर दुसऱ्यांदा 200 कोटीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीनं तिसरा ईमेल करत 400 कोटी रुपयांची मागणी आरोपींनी केली होती. 

यापूर्वीही आलेली ईमेलद्वारे धमकी 

यापूर्वी सुद्धा अनेकदा अंबानी कुटुंबांना असे धमकी  कॉल्स आणि ईमेल आलेत. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या  नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. 

त्यानंतर ऑगस्ट 2022 ला देखील  मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आतंकवादी अफजल गुरु आहे असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी आणि त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या आरोपीने रिलायन्स रुग्णालयात नऊ वेळा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर विष्णू बिंदू भूमिक या 56 वर्षीय आरोपीला बोरीवलीमधून ताब्यात घेण्यात आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget