एक्स्प्लोर

Mukesh Ambani : श्री रामलला प्राणप्रतिष्ठेचा उद्योगजगतातही उत्साह, मुकेश अंबानींचे अँटिलिया निवासस्थान सजले

Ayodhya Ram Mandir : मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह अनेक उद्योगपतींना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण आहे.  

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येमध्ये श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचली असून देशभर उत्साहाची लाट पसरली आहे. जय श्रीरामाच्या या उत्साहाच्या लाटेतून आता जगभरात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घरही सुटलं नाही. मुकेश अंबानी यांचे मुंबईतील 'अँटिलिया' हे निवासस्थान (Mukesh Ambani Antilia House) सजवण्यात आलं आहे. जय श्री राम असं लिहित मुकेश अंबानी यांचे घर सजवण्यात आलं आहे. 

अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीय उद्योग जगतातील ज्या लोकांना आमंत्रण मिळाले आहे, त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा समावेश आहे.

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याच्या अँटिलिया या निवासस्थानाला विशेष सजावट करण्यात आली आहे, तसेच इमारतीवर लेझरच्या लाईटनेही रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या गुच्छ आणि रंगीबेरंगी दिव्यांनी घर सजवण्यात आले आहे. प्रभू रामाच्या स्वागतासाठी अँटिलिया बिल्डिंगचे इतर भागही सजवण्यात आले आहेत. घराच्या आत आणि बाहेर हिंदू धर्माची चिन्हे आणि प्रभू रामाशी संबंधित चित्रे लावण्यात आली आहेत. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचे अंबानी कुटुंबीयांनी म्हटले आहे.

अयोध्यानगरी सजली

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा तो क्षण अवघ्या काही क्षणांमध्ये पार पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सज्ज झाली, मंदिरामध्ये गेले अनेक दिवस वेदपठण, जपानुष्ठान सुरु आहे. अवघं वातावरण चैतन्यमय झालं आहे. घनपाठ, होमहवन, देवअधिवास, चार वेदांचं पठण, पुण्याहवाचन असे सात्विक आणि धार्मिक कार्यक्रम मंत्रोच्चारात, रामनामात मंगलमयरित्या संपन्न होत आहेत. 

मंदिर सजून गेलं आहे, शिखर असेल, घुमट असेल, प्रत्येक खांब असेल सगळीकडे फुलापानांची आरास दिसते आहे, रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत तर दुसरीकडे पूजेसाठी बसणारे यजमान असोत की पूजा सांगणे पुरोहित सारेजण रामकार्यात गुंग होऊन गेले आहेत. साऱ्यांना आता आस एकच लागली आहे ती म्हणजे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget