MPSC परीक्षा अखेर पुढे ढकलली! मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने एमपीएससी (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर उद्या होणारा बंदही मराठा संघटनांकडून मागे.
मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून MPSC पुढे ढकलण्यात आली आहे.
तलवार कुणा विरोधात उपसणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांचा संभाजीराजे यांना सवाल
10 तारखेचा बंद मागे मराठा आरक्षण संघर्ष समितीनं मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. नऊ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं केली होती. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिला होता. मात्र, आता परीक्षा पुढे ढकलल्याने बंद मागे घेण्यात आला आहे.
बैठकीकडे पुन्हा उदयनराजेची पाठ राज्यभरात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजात विविध गट निर्माण झाले आहेत. यामध्ये इडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजूने एक गट आहे तर दुसरा गट एसइबीसीचं आरक्षणचं मिळायल हवं यासाठी आग्रही असल्याचं पाहिला मिळत आहे. हे गट मोडून सर्व नेत्यांची एकच मागणी व्हावी यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीचं नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावं अशी आग्रही मागणी होती. परंतु या बैठकीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पाठ फिरवल्याचं पहिला मिळालं. याआधी नाशिक आणि पुणे येथे विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण विचार मंथन बैठीकच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील खासदार उदयनराजे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं परंतु उदयनराजे यांनी त्यादेखील बैठकांकडे पाठ फिरवली होती.
WEB EXCLUSIVE | "मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात सरकारने प्रयत्न कमी आहेत" - संभाजीराजे छत्रपती