(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MP Sanjay Raut on Shraddha Murder Case : मारेकऱ्यावर खटले न चालवता, भरचौकात फासावर लटकवा; श्रद्धा हत्याकांडावर संजय राऊतांचा संताप
MP Sanjay Raut on Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर प्रकरणातील मारेकऱ्यावर खटले न चालवता भरचौकात त्याला फासावर लटकवा, असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय.
MP Sanjay Raut on Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या प्रकरणात कुणी राजकारण करु नये, मारेकऱ्यावर खटले न चालवता भरचौकात त्याला फासावर लटकवा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणावर कोणीही राजकारण करु नये, असंही म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं आहे की, "आमच्या महाराष्ट्रातील मुलीची ज्याप्रकारे हत्या झाली, ते अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाज माध्यमांवरुन ओळखी होतात आणि त्या ओखळींचं रूपांतर भयंकर नात्यात होतं. आणि ज्या पद्धतीनं त्या मुलीचे तुकडे तुकडे करुन मारलंय, त्या मुलीच्या वडिलांची मुलाखत मी आता वाचत होतो की, त्या मुलीच्या वडिलांचा, कुटुंबीयांचा आक्रोश आहे. त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे."
"कोणत्या धुंदी आणि गुंगीत ही मुलं जगतायत, हे आज पुन्हा एकदा कळलंय. आपला जीव गमावताय. अशा लोकांना जे खूनी आहेत, हत्यारे आहेत. यांच्यावर खटलेही चालवू नयेत. या प्रकरणावर राजकारण कोणी करत असेल तर ते बंद केलं पाहिजे. यांच्यावर खटले न चालवता, हा जो परिस्थितीजन्य पुरावा समोर दिसतोय, त्या आधारे त्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे.", असंही संजय राऊत म्हणाले.
"आपल्या मुलींनीही सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे. अशाप्रकारे फसवून जे काही केलं जातंय ही विकृती आहे. पण विकृतीपेक्षाही पुढचं पाऊल आहे. जे रोज खुलासे होतायत, ती थरारक आहे. आम्ही आमच्या मुलींकडे पाहतो की, आम्ही कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो. यावर कोणी कोणत्याही प्रकारचं राजकारण करत असेल, तर तेसुद्धा समाजाचे शत्रू आहेत, असं मी मानतो." , असंही ते म्हणाले.
हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच... : संजय राऊत
"बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही", असं म्हणत संजय राऊतांनी थेट शिंदे गटाला सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच बाळासाहेबांच्या स्मारकावर या; संजय राऊतांनी शिंदे गटाला थेटच सुनावलं