एक्स्प्लोर
पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत

मुंबई : माणुसकीला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार मुंबईतल्या अंधेरीत समोर आला आहे. 80 वर्षांच्या जन्मदात्या आईवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी सुरेंद्र सत्तार वैद्य नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आगे.
महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पीडित मायावती वैद्य यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
या अत्याचाराचा व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पीडित वृद्धेची सून, मुलगी आणि नातीने काढला असून रेकॉर्डिंग करताना त्यांच्या हसण्याचा आवाजही येत आहे.
वृद्धेवरील अत्याचार किती भीषण होते हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. नराधम मुलगा ओढणी पंख्याला बांधून, ती आईच्या पायात अडकवून तिला ओढत असे.
हा सैतान मुलगा मागील तीन वर्षांपासून आईचा अमानुष छळ करत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारात सुरेंद्रला मदत करणारी त्याची पत्नी आणि बहिणीविरोधातही डीएननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा सुरेंद्र, बहु आणि मुलीविरोधात भारतीय दंडविधान कलम 354, 352, 336, 506 (2अ), 504 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी मुलगा, सून आणि मुलीला अटक केली असून त्यांना आज अंधेरी कोर्टात सादर करण्यात येईल.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आशिया कप 2022
पुणे
हिंगोली
Advertisement
Advertisement



















