बीएमसी प्रशासनाची डोकेदुखी वाढली, 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण 'नॉट रिचेबल'
कोरोना व्हायरची चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूक होते. त्यामुळे बीएमसी प्रशासनासमोर हे नवं आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट कायम असताना मुंबई महापालिका प्रशासनाची डोकेदुखी आणखी एका कारणाने वाढली आहे. कोरोना व्हायरसची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत तर काही जण अर्धवट माहिती देतात. त्यामुळे त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे.
एकीकडे मुंबईत कोरोनाग्ररस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामुळे आधीच महापालिका प्ररशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान आहे. असं असताना मुंबई महापालिका प्रशासनासमोर कोरोनाबाधित रुग्णांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. तब्बल 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिलेल्या पत्त्त्यावर राहत नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत, तर अनेकांचे फोनही बंद आहेत.
कोरोना व्हायरची चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूक होते. अशावेळी तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याला शोधताना नाकीनऊ येत आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी याबाबत सांगितलं की, अशा व्यक्तींचा शोध मतदार याद्या किंवा प्रॉपर्टी टॅक्सचे रेकॉर्ड यावरचा नेमका पत्ता शोधून घ्यावा लागत आहे. अशा लोकांना ओळखणाऱ्या अन्य व्यक्तींचा पत्ता शोधून त्यांना फोन करुन रुग्णांपर्यंत पोहोचणं जिकीरीचं होत आहे. यात मुंबईकरांच्या लहानशा चूकीमुळे प्रशासनाचा वेळ आणि उर्जा खर्च होते आहे.
कुठे किती रुग्ण गायब?
- अंधेरी पूर्वमध्ये 27 रुग्ण
- धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थमध्ये 21 रुग्ण
- अंधेरी पश्चिममध्ये 12 रुग्ण
- एस वॉर्डमध्ये 30 रुग्ण
- Lockdown 4.0 | राज्य शासनाची नियमावली जाहीर
- Coronavirus: जगात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 4.1 मृत्यू, तर देशात 0.2 मृत्यू