एक्स्प्लोर

Drugs case : नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, मोहित कंबोज यांची टीका 

Mumbai Drugs case updates : नवाब मलिक (Nawab Malik) यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असं मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांनी म्हटलं आहे.नवाब मलिक आता स्वत: हिट विकेट झाले आहेत असंही कंबोज म्हणाले.  

Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  यावरुन आता मोहित कंबोज यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.नवाब मलिक आता स्वत: हिट विकेट झाले आहेत. आता त्यांना काय करावं हे कळत नाहीय, असंही कंबोज म्हणाले.   राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. माझी नवाब मलिकांना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींशी ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सांगा असा सवाल कंबोज यांनी केला आहे. 

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप 

अस्लम शेख आणि काशिफ खान यांच्या संबंधाबाबत नवाब मलिकच आज बोलले आहेत. महाविकास आघाडीतल्या नेत्यांचे, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुला-मुलींचे ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध आहेत हे देखील नवाब मलिकांनी सांगावं, असं कंबोज म्हणाले. 

राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध कसे? मोहित कंबोज यांचा मलिकांना सवाल

मोहित कंबोज म्हणाले की, मला नवाब मलिक मास्टरमाईंड म्हणतात,एक महिना काय झोपले होते का?आजच कसं सुचलं.  सुनील पाटीलशी संबंध आहे हे देखील मलिकांनी मान्य केलं आहे.  चिंकु पठाण या ड्रग्ज माफियाचे समीर खानशी कोणते संबंध? चिंकू पठाणची अनिल देशमुख यांच्यासोबत गुप्त बैठक झाली होती. नवाब मलिकांना मला सांगायचंय की मी तुम्हांला घाबरत नाही, माझ्यावर केस टाकल्या,चौकश्या झाल्या तरी मी घाबरत नाही. सुनील पाटील आणि नवाब मलिकांची मैत्री आजची नाही 20 वर्षांपासून आहे, असंही मोहित कंबोज म्हणाले. 

नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...

माझ्या पत्रकार परिषदा आणि माझी लढाई भाजपकडून नाही माझ्या वैयक्तिक स्तरावरुन आहेत. 350 कोटीची संपत्ती मी स्वत: डिक्लेअर केली आहे. 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत असतील तर पुरावे घेऊन या. नवाब मलिकांच्या परिवारालाच आता त्यांच्या संपत्तीवरुन उत्तरे द्यावी लागतील, असं कंबोज म्हणाले. 

काय म्हणाले नवाब मलिक 

आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासोबतच मलिक यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असंही मलिक म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget