एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध कसे? मोहित कंबोज यांचा मलिकांना सवाल

Mumbai Drugs case updates :आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik)केला आहे. यावरुन आता कंबोज यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे.

Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यावरुन आता मोहित कंबोज यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. माझी नवाब मलिकांना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींशी ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सांगा असा सवाल कंबोज यांनी केला आहे. 

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप 

मोहित कंबोज म्हणाले की, मला नवाब मलिक मास्टरमाईंड म्हणतात,एक महिना काय झोपले होते का?आजच कसं सुचलं. नवाब मलिक यांना खोटं बोलायची सवय आहे.  सुनील पाटीलशी संबंध आहे हे देखील मलिकांनी मान्य केलं आहे.  चिंकु पठाण या ड्रग्ज माफियाचे समीर खानशी कोणते संबंध? चिंकू पठाणची अनिल देशमुख यांच्यासोबत गुप्त बैठक झाली होती. नवाब मलिकांना मला सांगायचंय की मी तुम्हांला घाबरत नाही, माझ्यावर केस टाकल्या,चौकश्या झाल्या तरी मी घाबरत नाही. सुनील पाटील आणि नवाब मलिकांची मैत्री आजची नाही 20 वर्षांपासून आहे, असंही मोहित कंबोज म्हणाले. 

माझ्या पत्रकार परिषदा आणि माझी लढाई भाजपकडून नाही माझ्या वैयक्तिक स्तरावरुन आहेत. 350 कोटीची संपत्ती मी स्वत: डिक्लेअर केली आहे. 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करतअसतील तर पुरावे घेऊन या. नवाब मलिकांच्या परिवारालाच आता त्यांच्या संपत्तीवरुन उत्तरे द्यावी लागतील, असं कंबोज म्हणाले.  मी ललित हॉटेल ला गेलो होतो का याबाबत सीसीटीव्ही चेक करा. नवाब मलिकांनी सलिम-जावेदची खोटी फिल्म सुरु केलीय, असंही कंबोज म्हणाले. 

काय म्हणाले नवाब मलिक 

आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासोबतच मलिक यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असंही मलिक म्हणाले.

मलिक यांनी म्हटलं आहे की,  क्रूझ मध्ये जी केस बनवण्यात आली त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असं म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर होतो. याचा मालक काशिफ खान आहे. त्याला आत्तापर्यंत अटक का झाली नाही. तो आमचे मंत्री अस्लम शेख यांना येण्यासाठी खूप फोर्स करत होता. तो व्यक्ती इतर देखील सेलिब्रिटींच्या मुलांना पार्टी मध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. यांचा असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना अशा प्रकरणात त्यांना अडकवायचं? असं मलिक यांनी म्हटलं आहे.   7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही मलिक म्हणाले.

नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget