एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
करण जोहरच्या ऑफिसबाहेर मनसेचं आंदोलन
मुंबईः मनसे चित्रपट सेनेने सिनेनिर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉक्शनच्या कार्यालयासमोर आज निषेध आंदोलन केलं. करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान हा एक भूमिका साकारतोय. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत मनसेनं हे आंदोलन केलं.
यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकेतही घेतलं. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने मुंबईतील सर्व पाक कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिला होता. तसंच ज्या सिनेमा आणि मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकार असतील, त्या बंद पाडू असंही मनसेनं म्हटलं होतं.
मनसेच्या अल्टीमेटमंतर अनेक वाहिन्यांनी पाकिस्तानी कलाकारांचे शो बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र करण जोहरने पाकिस्तानी कलाकारांना हाकलल्याने प्रश्न सुटणार नाही, असं मत मांडलं होतं. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत करण जोहरच्या मुंबईतील ऑफिससमोर आंदोलन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement