एक्स्प्लोर

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण; निर्णय 19 मे रोजी

MNS Leader Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 19 मे रोजी मुंबई सत्र न्यायालय अटकपूर्व जामीनावर निकाल देणार आहे.

MNS Leader Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 19 मे रोजी मुंबई सत्र न्यायालय अटकपूर्व जामीनावर निकाल देणार आहे. दरम्यान, मनसेच्या आंदोलनाच्या दिवशी पोलिसांना गुंगारा देत 

मनसे नेता संदीप देशपांडे आणि संतोष धुरीच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मनसे नेते संदीप देशपांडेंतर्फे वकील सुजित जगताप यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी स्थानिक पोलीस उपायुक्त प्रणय अशोक हेदेखील कोर्ट रूममध्ये उपस्थित होते. मनसे नेते संदीप देशपांडेच्या जामीन अर्जला राज्य सरकारकडून कडाडून विरोध करण्यात आला. तसेच, सरकारतर्फे जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात आलं. जामीन दिल्यास पोलीस तपासावर परिणाम होऊ शकतो. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते दोघेही राजकीय नेते आहेत, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला. 

मनसेतर्फे वकील सयाजी नांगरे यांनी युक्तीवाद करताना आम्हाला 149ची नोटीस दिली, त्याचा आम्ही सन्मान केला. आम्ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. आम्ही पोलिसांना धक्का दिलेला नाही. त्यामागे पळत आल्या आणि ड्रायव्हरनं गाडी पुढे नेली त्यावेळी त्या पडल्या. पोलीस तक्रारारीत देखील कुठेच नाहीये की, आम्ही पोलिसांना धक्का दिला. 

राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही युक्तीवाद केला. "संदीप देशपांडे आणि इतर नेते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातून जेव्हा बाहेर आले, तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांना बाजूला नेलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलून येतो, असं सांगितलं. मात्र दोघांचा इरादा वेगळाच होता. माध्यमांशी बोलण्याचा केवळ बनाव त्यांनी केला. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही चालत्या गाडीत बसून पळून गेले. जर ते सुजाण नागरीक आणि कायद्याचा पालन करणारे असते तर त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं असतं", असं सरकारी वकील प्रदिप घरत यांनी बोलताना सांगितलं. 

"या घटनेमध्ये रोहिणी माळी या महिला पोलीस कर्मचारी यांना दरवाजा लागला. त्या खाली पडल्या. त्यांना खांद्याला आणि पाठीला मार लागला, पण तो गंभीर नव्हता. गाडी चालकानं गाडीही जलदगतीनं चालवली, असा आरोप आहे. चालकानं गाडीचा दरवाजा उघडा आहे, हे न पाहताच गाडी चालवली. त्या ठिकाणी तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी झालेल्या पळापळीत महिला पोलीस जखमी झाली. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकानं गाडी चालवली. यावेळी गाडीचे एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेलं. त्यामुळे पकडही सैल झाली. तसेच धावत्या गाडीचा उघडा दरवाजा महिलेला लागला आणि ती जमिनीवर कोसळली. या अपघातात महिलेच्या पाठीलाही जखम झाली. मात्र काही अंतरावर आरोपींनी गाडी बदलीकरून ते नवी मु़ंबईच्या दिशेने गेले.", अशी  माहिती घरत यांनी मु़ंबई सत्र न्यायालयात दिली आहे. 

नेमकं काय घडलं? 

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाहीतर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget