एक्स्प्लोर

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे.

मुंबई: मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. कारण या चार नगरसेवकांनी  पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असाही दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या नगरसेवकांनी दोन तासांनी निर्णय कळवणार असल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र याबाबत मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक : अर्चना भालेराव – वॉर्ड 126 परमेश्वर कदम – वॉर्ड 133 अश्विनी मतेकर- वॉर्ड 156 दिलीप लांडे – वॉर्ड 163 संजय तुर्डे – वॉर्ड 166 हर्षल मोरे – वॉर्ड 189 दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197  वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत. मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
  • शिवसेना अपक्षांसह – 84 +  4 अपक्ष = 88
  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
  • कॉंग्रेस – 30
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
  • मनसे – 7
  • सपा – 6
  • एमआयएम – 2
 
संबंधित बातम्या :

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

महत्त्वाच्या बातम्या

KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget