संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल, तर हे चुकीचं : राज ठाकरे
संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे चुकीचं आहे. या सर्वांना आता महाराष्ट्रातून जाऊ नये. आज त्यांची महाराष्ट्राला त्यांची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई : मुंबईवर कोरोनाचं संकट आल्यावर परराज्यातून आलेले आता आपल्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिले आणि पैसे कमवले. मात्र आता संकट आल्यावर आपल्या राज्यात जाण्याचा विचार करणार. मात्र हे परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यावर त्यांची कामं कोण करणार आहे. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे चुकीचं आहे. या सर्वांना आता महाराष्ट्रातून जाऊ नये. आज त्यांची महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. संकटकाळात ज्या राज्याने तुम्हाला सर्व काही दिलं त्याला सोडून का जात आहात? असंही राज ठाकरेंनी विचारलं.
परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येण्यास माझा विरोध नाही. मात्र परप्रांतीय सुरुवातीला मान खाली घालून येतात, नंतर मान वर करुन दादागिरी करतात हे चालणार नाही. नोकरी-धंदा करण्यासाठी येताय त्यांना कुणी विरोध करत नाही. मात्र एवढी वर्षे महाराष्ट्राचे राहत आहात, तर इथले व्हा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? कोरोना असा संपणार नाही : राज ठाकरे
लॉकडाऊन वाढवून प्रश्न सुटणार आहेत का? लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढवणार? त्यामुळे कोरोना संपणार आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सरकारच्या नियोजनातही काही त्रुटी आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकानं दिवसभरात अवघी काही तास उघडी ठेवली तर लोक गर्दी करणारच. लोकांना काही मोकळीक दिली तर लोक सर्व नियम पाळून कोरोनापासून बचाव करतील आणि सर्व सुरळीत सुरु राहिल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
लॉकडाऊन किती वेळ सुरु ठेवणार यालाही काही मर्यादा असायला हव्यात. अजून किती दिवस लॉकडाऊनमध्ये घालवणार. सर्व गोष्टी बंद ठेऊन देशाचं आणि राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अपघातांमध्ये दरवर्षी अनेक लोक मरतात, मग कुणी गाडी, रेल्वेत बसायचं बंद करतं का? कोरोनाचा परिणाम किती आहे, त्यात मृत्यूचं प्रमाण किती आहे. सरकारनेही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. कोरोना असा लगेच जाणार असं वाटत नाही. त्यामुळे योग्य खबरदारी आणि काळजी घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. कोरोना कधी संपेल यावर लॉकडाऊन अवलंबून नसावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.