एक्स्प्लोर

Vijay Waddetiwar On Sanjay Kute : 'काँग्रेसचे आमदार फुटणार...; भाजप नेत्याचा दाव्यावर विजय वडेट्टीवाराचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'आमदार हॉटेलमध्ये ठेवले नाहीत...'

आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडत आहे. निवडणुकीमध्ये आमदार फुटण्याची भीती राजकीय पक्षांना आहे. अशातच काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई: आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी (Maharashtra Legislative Council Election 2024) मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये आमदार फुटण्याची भीती जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांना आहे. अशातच काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता कोणत्या उमेदवाराचा पराभाव होणार अशी चर्चा आहे. अशातच आता आमदार फुटाफुटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रसचे 8 आमदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. 4 आमदार राष्ट्रवादीने काँग्रेस(अजित पवार गटाने) तर भाजपने देखील 4 आमदार फोडल्याची चर्चा रंगली आहे. अशातच काँग्रेसचे किती आमदार फुटणार हे स्पष्ट दिसून येईल असं भाजपचे आमदार संजय कुटे(Sanjay Kute)यांनी म्हटलं आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार फुटणार नसून आम्हाला कोणतीही भिती नसल्याचं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

आमदार फुटीवर काय म्हणालेत संजय कुटे?

काँग्रेसचे जे 37 आमदार आहेत. त्यातील किती टिकतात हे निवडणुकीत दिसून येईल. काँग्रेसच्या मतांनी कुठं जायचंय आणि कोणाला मत द्यायचं यांची त्यांनीच व्यवस्थित काळजी घेतली आहे, असं आमदार संजय कुटे(Sanjay Kute) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

आमदार फुटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसची 9 मते फुटणार हा जावई शोध कुठून आणलात. काल (गुरूवारी) काँग्रेसचे 37 पैकी 35 आमदार उपस्थित होते. ज्यांना फुटीची भीती आहे ते हॉटेलमध्ये पळाले. त्यांनी आपले आमदार गोळा करून हॉटेलमध्ये आश्रय घेतला, आम्ही आमचे आमदार हॉटेलमध्ये ठेवले नाहीत असं म्हणत त्यांनी महायुतीतील पक्षांना टोला लगावला आहे,  महाविकास आघाडीचे तिन्ही आमदार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार?

काँग्रेसकडे अधिकची मतं आहेत. विधान परिषदेसाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर जी मते राहतील ती मतं फुटतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Embed widget