एक्स्प्लोर
मीरा भाईंदर मनपा निवडणूक : मतदानाची वेळ संपली, आता निकालाची प्रतीक्षा
मीरा-भाईंदर महापालिकेसाठी आज मतदान पार पडलं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 36 टक्के मतदान झालं. पावसामुळे मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी आज मतदान पार पडलं. सरासरी 47 टक्के मतदान झाल्याचा प्रथामिक अंदाज आहे, असी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
पावसामुळे मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांतील 95 जागांसाठी मतदान झाले. मतमोजणी उद्या (21 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही त्यांनी सांगितले
आ. मेहता मतदानाची वेळ संपल्यनंतरही मतदान केंद्रात!
मीरा-भाईंदर महापालिकेच्या मदतानाची वेळ संपल्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता मतदान केंद्रात गेल्याचा आरोप इतर पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. सेवन स्क्वेअर स्कूल या मतदानकेंद्रावर ही घटना घडली आहे. यावेळी इतर पक्षांच्या उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार गोंधळ घातला. सेव्हन स्क्वेअर स्कूल ही नरेंद्र मेहतांच्या मालकीची असल्याची माहिती मिळते आहे.
774 केंद्रांवर मीरा-भाईंदर महापालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 9 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक झाली. त्यापैकी एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज 94 वॉर्डसाठीच मतदान झालं. एकूण 510 उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. तर काँग्रेसची एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे.
दरम्यान, उद्या महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागणार असून, निकालाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
