एक्स्प्लोर
सत्ता कुणालाही दिली तरी माझ्याकडेच यावं लागेल: मुख्यमंत्री
"राज्य तर आमचं आहे, देशात नरेंद्र मोदी आहेत, इथे मी आहे. जर तुम्हाला सत्ता दिली, तर कामांसाठी तुम्हाला माझ्याकडेच यावं लागेल"
मुंबई: देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळं तुम्ही कुणालाही सत्ता दिली, तरी कामासाठी आमच्याकडेच यावं लागणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदरच्या मतदारांना आवाहन केलं.
मुख्यमंत्री म्हणाले, “काही लोक आम्ही हे करु, ते करु, अशी मोठ मोठी आश्वासनं देतात. मात्र तुम्ही ती पूर्ण कशी करणार? ना तुमची देशात सत्ता आहे, ना राज्यात. राज्य तर आमचं आहे, देशात नरेंद्र मोदी आहेत, इथे मी आहे. जर तुम्हाला सत्ता दिली, तर कामांसाठी तुम्हाला माझ्याकडेच यावं लागेल. माझ्याकडे येऊन तुम्हाला विनंती करावी लागेल. पण या दलालांची गरज काय, तुम्ही सरळ भाजपला सत्ता द्या, महापौर अभिमानाने माझ्याकडे येतील. मी त्यांना सांगेन, तुम्ही मिरा-भाईंदरपर्यंत पोहचेपर्यंत तुम्हाला विकासकामांसाठी पैसे मिळालेले असतील. असं कार्य आम्ही करु इच्छित आहोत”
काँग्रेसचा आक्षेप
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. “मुख्यमंत्र्यांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहेच, पण लोकशाहीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची तुलना दलालांशी करणं हे घातक आहे”, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी भिवंडीत हजारो कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण निवडणुकीनंतर विसरून गेले. तीच परिस्थिती पेणमध्ये झाली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजप केवळ आश्वासनांचं गाजर दाखवत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मिरा भाईंदर महापालिकेच्या 24 प्रभागातल्या 95 जागांसाठी 20 ऑगस्टला मतदान आणि 21 ऑगस्टला निकाल लागणार आहे.
95 जागांसाठी भाजपचे 93 उमेदवार
मिरा-भाईंदरच्या निवडणुकीत भाजपने एकूण 95 पैकी 93 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यात 57 उमेदवार हे गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असून उरलेले सगळे मराठी उमेदवार आहेत. विशेष म्हणजे भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेतून आलेल्यांना उमेदवारी दिली आहे.
संबंधित बातम्या
फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे
मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement