एक्स्प्लोर

Mhada lottery 22024: Video: म्हाडाच्या पवईतील लॅव्हिश घराचा व्हिडिओ समोर; जाणून घ्या किंमत; तुम्ही केलाय ना अर्ज

Mhada lottery 22024: म्हाडाकडून (Mhada) 2030 घरांसाठीच्या सोडतीपैकी पवईतील मध्यम गटासाठी देण्यात येत असलेल्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Mhada lottery 22024: मुंबई : राजधानी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा लॉटरी 2024 नुकतेच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीतील घरांच्या किंमतीवरुन चर्चा झाल्यानंतर, आणि नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाकडून या घरांच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. तसेच, म्हाडासाठी अर्ज करण्याची मुदतदेखील 19 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना व इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे यंदा 2030 घरांसाठी (Mhada Lottery 2024) लॉटरी काढण्यात आली.  मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ, पवई यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी निघणार आहे. त्यापैकी, पवईतील लॅव्हिश सदनिकांचा व्हिडिओ म्हाडाने शेअर केला आहे. 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे (Mhada lottery 2024) काढण्यात येत असलेल्या 2030 घरांसाठीच्या सोडतीपैकी म्हाडाकडून (Mhada) पवईतील मध्यम गटासाठी देण्यात येत असलेल्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, या फ्लॅटची डिझाईन, कारपेट एरिया, फर्निश आणि टॉयलेट बाथरुमचे दृश्य पाहायला मिळते. पवईतील (Pawai) हे घर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या निश्चितच पसंतीस पडेल असे आहे. कारण, उत्तम लूक, वेल डेकोरेटेड आणि किचन व स्टायलिश असे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी ही सदनिका (Home) आपली वाट पाहात आहे. मुंबईच्या (Mumbai) पवई उपनगरच्या गृहप्रकल्पात हे घर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीतून घेता येईल. 

म्हाडाच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरुन व्हिडिओसह माहितीही शेअर करण्यात आली आहे. ''म्हाडाने पवईमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्जित तयार सदनिकांचा सुंदर गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. या गृहप्रकल्पाचा समावेश मुंबई लॉटरीमध्ये करण्यात आला असून MHADA Lottery या मोबाईल ॲपवर किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये सहभागी होता येणार आहे.  त्यामुळे, मुंबईकरांचे पवईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकारता येईल.'', असे म्हाडाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे पवई उपनगरात मध्यम उत्पन्न गटासाठीचे हे घर एकदम लॅव्हिश आणि सुविधसंपन्न असल्याचं दिसून येतं.

घरांच्या किंमती 1 कोटी 20 लाख ते 1 कोटी 49 लाख

म्हाडाच्या पवई उपनगरातील या घरांच्या किंमती 1 कोटी 20 लाख ते 1 कोटी 49 लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यात, 1 कोटी 44 लाख रुपयांनाही काही घरे आहेत. म्हाडाच्या आरक्षणानुसार ह्या घरांसाठी अर्ज करता येईल. त्यात, अनुक्रमांक 15 मधील मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण 112 सदनिका आहेत. तर, अनुक्रमांक 16 मध्ये 117 सदनिका आहेत. तसेच, अनुक्रमांक 17 मध्ये 106 सदनिका आहेत. ज्या घरांची किंमत अनुक्रमे 1 कोटी 20 लाख, 1 कोटी 49 लाख आणि 1 कोटी 44 लाख रुपये असणार आहे. आरक्षण गटनिहाय ही घरे विभागली गेली आहेत.  

Mhada lottery 22024: Video: म्हाडाच्या पवईतील लॅव्हिश घराचा व्हिडिओ समोर; जाणून घ्या किंमत; तुम्ही केलाय ना अर्ज

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shahbaz Sharif on India: मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
Maharashtra Weather Today: राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध

व्हिडीओ

Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahbaz Sharif on India: मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
Maharashtra Weather Today: राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
Embed widget