एक्स्प्लोर

MHADA Building collapsed : चांदीवलीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये स्लॅब कोसळला, जीवीतहानी टळली

चांदीवलीमधील सुमारे तीस वर्षे जुनी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

मुंबई: चांदीवली येथील म्हाडा वसाहतीमधील निसर्ग हाऊसिंग सोसायटीमधील इमारत क्रमांक दहा मधील दोन माळ्यांचा  स्लॅब कोसळला आहे. अग्निशमन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सुदैवाने या दोन्ही घरात कोणी रहाण्यास नव्हते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे तीस वर्षे जुनी ही इमारत असल्याचं सांगण्यात येतंय.

आज दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. चांदीवली या ठिकाणी असलेल्या या इमारतीचे बांधकाम साधारणपणे 1992-93 च्या दरम्यान झालेलं आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील 105 क्रमांकच्या घरात दुरुस्ती चे काम सुरू होतं. यावेळी हा स्लॅब कोसळला. सुदैवाने ही दुर्घटना घडली त्यावेळी घरात कोणी नव्हतं. त्या ठिकाणी केवळ एक मजूर काम करत होता आणि तो किरकोळ जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दल, स्थानिक पोलीस पोहोचले आहेत. तर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता जुन्या इमारतींच्या स्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं आणि या जुन्या इमारती दुरुस्त करुन द्याव्यात अशी मागणी आता स्थानिकांतून व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, मुंबईतील जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून अशा प्रकारच्या घटना या आधीही घडल्या आहेत. पावसाळ्यात अनेक इमारती कोसळण्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या आहेत. महापालिका तसेच न्यायालयाने यासंबंधी अनेकदा आदेश देऊनही अशा जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये लोक राहतात.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget