Mumbai News : नवी मुंबईत पाच मजली इमारत कोसळली, चार जणांना वाचवण्यात यश, 12 जण अडकल्याची भीती
Maharashtra Building Collapse : घटनास्थळावरून पाच जणांची सुटका करण्यात आली असून इमारतीत आणखी 12 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra Building Collapse : नवी मुंबईतील नेरूळ परिसरात पाच मजली इमारत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेरूळ परिसरातील जिमी पार्क नावाच्या इमारतीचा संपूर्ण भाग कोसळला आहे. घटनास्थळावरून पाच जणांची सुटका करण्यात आली असून इमारतीत आणखी 12 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
Maharashtra | A part of building collapses in Navi Mumbai; rescue operation underway pic.twitter.com/zC0S05B8Oz
— ANI (@ANI) June 11, 2022
घटनास्थळावरून मिळानेल्या माहितीनुसार, इमारत कोसळळ्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून कोसळलेल्या इमारतीतून चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे तर, आणकी 12 नागरिक इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्यात मुंबईत इमारत कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. कालच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आज नवी मुंबईत इमारत कोसळण्याची घटना घडली आहे.
नेरुळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील रुममध्ये लादी बसवण्याचे काम सुरु होते. हॅाल मध्ये काम सुरू असतानाच सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. वरुन पडलेल्या स्लॅबच्या वजनाने खालच्या माळ्यापर्यंत संपूर्ण हॅालचा भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सहा मजल्यावरुन खालचे सगळे स्लॅब पडल्याने खिडकीत अडकून बसलेल्यांना ग्रील कापून बाहेर काढण्यात आले.
कोसळलेली इमारत 1994 साली बांधलेली आहे. अजून 30 वर्षेही पूर्ण न झालेल्या इमारतींचा भाग पडल्याने बांधकामाबाबत शंका उपस्थितीत होत आहे. त्यामुळे ही इमारत बांधलेल्या बिल्डरने शहरात अजून किती ठिकाणी बांधकाम केले आहे, याची चौकशी करुन स्ट्रक्चरल ॲाडिट केलं जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यात घरातील कामे काढून इमारतीला धोका पोचविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.