एक्स्प्लोर

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाईल.

मुंबई : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाईल. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड-माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर, तसंच पश्चिम रेल्वेमार्गावर भाईंदर-वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो रेल्वेमार्गांवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर सकाळी 10.37 वाजल्यापासून ते दुपारी 03.22 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व अप फास्ट लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर धावतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 20 मिनिटं उशिरानं धावेल. https://twitter.com/Central_Railway/status/934277177398345728 हार्बर रेल्वे हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या काळात पनवेल-सीएसएमटी, पनवेल-अंधेरी हार्बर वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील. हार्बरच्या प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेच्या मुख्यलाईनवर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते  वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी 11.00 वाजल्यापासून दुपारी 03.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात अप आणि डाऊन मार्गावरील सर्व स्लो लोकल फास्ट मार्गावरुन धावतील. मेगाब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. https://twitter.com/WesternRly/status/934307631782440960
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली

व्हिडीओ

Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
Embed widget