एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई लोकल : तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे अप फास्ट, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन स्लो मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.
मुंबई | मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे अप फास्ट, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन स्लो मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे फास्ट मार्गावरील लोकल स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावेल.
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकांदरम्यानची हार्बर लोकलसेवा ब्लॉकच्या काळात बंद राहणार आहे. ब्लॉकच्या काळात पनवेल-वाशी आणि सीएसएमटी-कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
मेगाब्लॉकच्या काळात हार्बरच्या प्रवाशांना मध्य रेल्वेवरुन प्रवास करण्याची मुभा असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
औरंगाबाद
निवडणूक
Advertisement