एक्स्प्लोर

Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; मध्य, हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

Mega Block : मुंईच्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3. 55 पर्यंत  मेगाब्लॉक असणार आहे. 
 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येऊन  भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.  तर घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3. 50 या वेळेत  सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि या स्थानकांदरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.   
 
हार्बर मार्गावर असा असणार मेगाब्लॉक
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.2 ते दुपारी ते 3.53 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या आणि ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. याबरोबरच  ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. शिवाय  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागांत विशेष उपनगरीय गाड्या धावतील. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget