एक्स्प्लोर
सरोद वादक अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना यंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
![सरोद वादक अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान Master Dinanath Mangeshkar Award 2018 : Sarod Maestro Amjad Ali Khan awarded latest update सरोद वादक अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/24232508/Dinanath-Mangeshkar-Award-2018.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना यंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आशाताईंच्या 75 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला.
सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा गौरव करण्यात आला. खेर सध्या एफटीआयआयचं अध्यक्षपद भूषवत असून त्यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण प्रदान करुन केंद्र सरकारने सन्मानित केलं आहे. अनुपम खेर यांनी असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनाही पत्रकारितेतील योगदानासाठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गेल्या दहा वर्षांपासून ते 'माझा'चं संपादकपद भूषवत असून जवळपास 25 वर्षांपासून राजीव खांडेकर पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
उद्योगक्षेत्रातील कामगिरीसाठी धनंजय दातार यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील धनंजय दातार या तरुणाने जिद्दीने दुबईत छोटंसं किराणा स्टोअर्स सुरु केलं आणि पाहता पाहता त्यांच्या उद्योग समुहाच्या 23 शाखा झाल्या. दातार यांना दुबईच्या सुलतानाने 'मसाला किंग' ही उपाधी देऊन गौरवलं आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यातील क्षणचित्रे
याशिवाय कवी योगेश गौर यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी, शेखर सेन यांना नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी गौरवण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट नाटकाचा मोहन वाघ पुरस्कार 'अनन्या' या नाटकाला प्रदान करण्यात आला. प्रताप फड लिखित-दिग्दर्शित अनन्या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. संकटांचा डोंगर कोसळूनही त्याला धीराने सामोरं जाणाऱ्या 'अनन्य'साधारण तरुणीची कथा या नाटकात रेखाटली आहे. 'अनन्या' नाटकाचा प्रयोग पाहून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारतीताई यांनी ऋतुजाला गळ्यातली सोनसाखळी भेट देऊन तिचं कौतुक केलं होतं.
![सरोद वादक अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/24232606/Rajeev-Khandekar.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)