Marathi Bhasha Din : सुप्रिया सुळेंनी सांगितलं इंग्रजी शाळेत शिकण्याचं कारण
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात सुरू आहे.
Marathi Bhasha Din : ''माझ्या कुटुंबात इंग्रजी माध्यमात जाणारं पहिलं मूल म्हणजे मी होते. माझी सगळी भावंडं मराठी माध्यमात शिकली, मी पहिली मुलगी होते जी इंग्रजी माध्यमात शिकले. माझ्या आईचा हा आग्रह होता. जगाला तोंड देण्यासाठी, टिकण्यासाठी म्हणून इंग्रजी माध्यमात शिकली पाहिजे असं म्हणून आईने तो निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत आमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. इतरांना बोलण्यापेक्षा आम्ही आर आर पाटलांचं उदाहरण देतो. आबांची मुलं मराठी शाळेत शिकली, असं राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.
मराठी. अभिजात मराठी. आपल्या मनामनात दंगणारी मराठी. आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात सुरू आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे. आज पहिल्या सत्रात राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या बोलत होत्या.
मातृभेवर प्रेम करा, मात्र इंग्रजीचा द्वेष नको - सुप्रिया सुळे
सिंगापूर आणि चायनाने खूप मोठा प्रयोग मँडरिन भाषेवर केला. त्यांनी मँडरिनसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी जर तुम्हाला मँडरिन भाषा चांगली आली तर तुम्हाला 20 मार्क जास्त देण्यात येतात. चायना आणि सिंगापूरमध्ये अशी एक पिढी होऊन गेली, जिला मँडरिन भाषाच आली नाही. आता पुन्हा भाषेबद्दलचा तो बदल होताना दिसत आहे, असे काही वेगळे प्रयोग झाले पाहिजे, असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, ''तामिळ खासदारांना हिंदी येत नाही. त्यांना तामिळ आणि उत्तम इंग्रजी बोलतात. त्यामुळे ते लोकसभेत इंग्रजीत बोलतात.'' त्या म्हणाल्या, ''तामिळनाडूत गेल्यास, तिथे सर्व बोर्ड्स तामिळ किंवा इंग्रजी भाषेत असतात. अशा वेळी काय करायचं. मातृभेवर प्रेम केलंच पाहिजे. मात्र इंग्रजीचा द्वेष करून आपला प्रश्न सुटणार नाही.'' पहिल्या चर्चासत्रात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhadh Desai), खासदार सुप्रिया सुळे (supriya Sule), भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) उपस्थित होते. या सत्राचं संचालन एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी केलं.
संबंधित बातम्या :
- Marathi Bhasha Din : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी? मराठी भाषा मंत्री थेट म्हणाले...
- Marathi Bhasha Din : मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको : विनोद तावडे