एक्स्प्लोर

Marathi Bhasha Din : मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको : विनोद तावडे 

Marathi Bhasha Din : मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.  

Marathi Bhasha Din : मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा असं म्हणत माजी मराठी भाषा मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको, असं म्हटलं आहे. मार्केटिंग कॉल येतात त्यांच्याशी मी मराठीत बोलतो, जर 13 कोटी मराठी लोकांनी असं केलं तर कॉलसेंटरमध्ये ज्याला मराठी येते त्यालाच नोकरी मिळेल. मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको. जिथे अर्थ समजण्यासाठी आवश्यक तसे शब्द वापरले पाहिजेत. मराठी वाचवण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्थेने करावं, सर्व माध्यमांनी करायला हवं. कोण कमी पडलं याला महत्व नाही, काय कमी पडलं यावर आपण विचार करायला हवा.

मराठी. अभिजात मराठी. आपल्या मनामनात दंगणारी मराठी.आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात होणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.  

पहिल्या चर्चासत्रात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), खासदार सुप्रिया सुळे (supriya Sule), भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) उपस्थित होते. या सत्राचं संचालन एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी केलं.

मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा

पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा. हा आत्मविश्वास आम्ही सामान्य माणसांच्या मनात बिंबवायला हवा होता. मराठी भाषेला स्थान देण्याचं काम आपल्यालाच द्यावं लागणार आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानं काय होईल, निधी मिळेल. राजकीय व्यवस्थेनं मराठी भाषेची चळचळ रुजवण्यासाठी सामान्यांच्या मनात आत्मविश्वास करायला हवा होता तो आम्ही करु शकलो नाहीत, हे वास्तव आहे, अशी कबुलीही माजी मराठी भाषा मंत्री राहिलेल्या विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. अनावश्यक हट्ट धरल्यानं मराठी पुढं जाईल का? याबाबत शंका आहे असं ते म्हणाले. मराठी डिजिटलवर अधिकाधिक कशी येऊ शकेल यासाठी प्रयत्न व्हायला हवा. 

संबंधित बातम्या

Marathi Bhasha Din LIVE : एबीपी माझावर मायमराठीचा जागर, पाहा प्रत्येक अपडेट्स

Marathi Bhasha Din : ..म्हणून आम्ही इंग्रजी शाळेत शिकलो : सुप्रिया सुळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget