एक्स्प्लोर
'बंद दाराआड राधे माँच्या लिला', भक्ताचा गंभीर आरोप
मुंबई: राधे माँ... स्वतःकडे दिव्यशक्ती असण्याचा दावा करणारी स्वयःघोषित राधे माँ. मात्र, या कथित अध्यात्माच्याआढून राधे माँ ही आपल्या अजब-गजब कारभारानंच चर्चेत राहिली आहे. राधे माँच्या चौकीच्या बंद दाराआड काय होतं? याची चर्चा आता सुरु झाली आहे. कारण, राधे माँ ही आक्षेपार्ह नृत्य करत असल्याचा आरोप एका राधे माँच्या कधीकाळी भक्त राहिलेल्या व्यक्तीनं केला आहे.
राधे माँ... पुन्हा चर्चेत आहे. तीच राधें माँ... जी स्वतःला प्युअर सोल समजते, तीच राधें माँ... जी भक्तांसाठी गाणी म्हणते. तीच राधे माँ.. जी भक्तांना आय लव्ह यू म्हणते. तीच राधे माँ... जी भक्तांसाठी कॅबरे करते. हे सगळं सुरु असतं राधे माँच्या चौकीमध्ये...
मुंबईतले प्रख्यात एम एम मिठाईवालाचे मालक मनमोहन गुप्तांचं घर राधे माँच्या स्वागतासाठी होतं. स्वागतासाठी हत्ती-घोडे आणले होते. ढोल ताशांच्या तालावर भक्त तल्लीन झाले होते. राधे माँला पाहण्यासाठी दरवाजावर तुंबळ गर्दी झाली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर राधे माँ प्रकट होते. तेही आलिशान जॅग्वारमधून. राधे माँ चौकीत पोहोचेपर्यंत तिच्यावर फुलांचा अखंड वर्षाव सुरु असतो. भक्त राधे माँला चक्क उचलून सिंहासनापर्यंत घेऊन जातात. मग सुरु होते राधे माँच्या दर्शनाची रांग...
एकामागोमाग एक भक्तगण राधे माँच्या पायावर देणग्या अर्पण करतात. ज्यात काही फिल्म स्टार्सही असतात. फिल्म अभिनेत्री रीना रॉय देखील त्याच भक्तांपैकी एक. दर्शनानंतर आता वेळ असते ती दिव्य दर्शनाची.
मनमोहन गुप्तांच्या परिवारातल्या सुना राधे माँला साद घालतात. तितक्यात राधे माँ आपल्या सिंहासनावरून उठते आणि बेभान होऊन नाचते. यालाच म्हणतात राधे माँचं कथित दिव्य दर्शन.
मनमनोहन गुप्ता काही वर्षांपूर्वी यांच्यात घरात राधे माँची चौकी लागली होती. या चौकीत मनमोहन गुप्ताही तल्लीन झाले होते... पण आज हेच मनमोहन गुप्ता यांनी राधे माँच्या चौकीची पोलखोल केली आहे.
राधे माँमध्ये कोणतीही दिव्य शक्ती नाही. तर ती जादूटोणा करुन वशीकरण करणारी एक महिला आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.
ज्यांच्या घरी राधे माँची चौकी लागायची. त्याच मनमोहन गुप्तांचा हा दावा भयानक आहे. या चौकीच्या आड राधे माँ भक्तांना गंडवत असल्याचा दावा गुप्तांचा आहे.
राधे माँच्या चौकीचा रेट फिक्स असतो. राधे माँच्या फर्माईशीप्रमाणे व्यवस्था करावी लागते. त्यासाठी लाखोंचा खर्च येतो. पण भक्तांच्या देणगीतून तो वसूल केला जातो. बड्या सिताऱ्यांना मात्र इथं पैसे देऊन बोलावलं जातं आणि हे सेलिब्रिटी राधे माँचे भक्त असल्याचं भासवलं जातं.
पण या चौकीमागे आणखी एक चौकी लागते. बंद दाराआडची चौकी. त्या चौकीत फक्त राधे माँच्या खास भक्तांना एन्ट्री असते. त्या चौकीत राधे माँ चक्क फिल्मी गाण्यांवर थिरकते. याच बंददाराआड होणारा अश्लील डान्स शूट करून राधे माँ आपल्या भक्तांना ब्लॅकमेल करत असल्याचा दावाही गुप्ता करतात
राधे माँ लोकांच्या दुःखांना कुरवाळते. त्यांचं दु:ख दूर करण्याचा दावा करते आणि भक्त गुरफटताच, त्याला बरबाद करते, असाही आरोप गुप्तांचा आहे.
10 वर्षांपासून राधे माँच्या चौकीचा खेळ सुरु आहे. प्रत्येक चौकीतून जमा होणारी रक्कम राधे माँ आपल्या कब्जात घेते. या धंद्याने राधे माँला करोडपती केल्याचा दावा गुप्तांचा आहे. इतकंच नाही, तर गुप्तांची सारी संपत्तीही राधे माँनं लुटल्याचा दावा ते करतात.
राधे माँविरोधात पहिली तक्रार केली, ती निक्की गुप्ताने. तिच्या लग्नातही राधे माँने लाखोंची संपत्ती लुटल्याचा दावा निक्कीच्या भावाने केला आहे.
पण हे सारे आरोप धादांत खोटे असल्याचा दावा राधे माँचे भक्त आणि मनमोहन गुप्तांचे भाऊ जगमोहन गुप्तांचा आहे.
आतापर्यंत ज्यांनी राधे माँची चौकी लावली. तेच आता राधे माँचा बुरखा फाडू लागले आहेत. या गौप्यस्फोटांनी राधे माँचे सारे कारनामे जगजाहीर झाले आहेत. त्या चौकीच्या दाराआडचं सत्यही समोर आलं आहे. तरीही राधे माँच्या प्रेमात आकंठ बुडालेले भक्त अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून त्या बंद दाराआड नाचत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement