एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार?
फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या नामकरणाच्या ठरावाला मंजुरी दिली होती.
![सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार? Management decided to change the name of Sachin Tendulkar's Shardashram school सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/25040334/Sharadashram_Sachin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ज्या शाळेने घडवलं, त्या मुंबईतील दादरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापनाने शाळेचं 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असं नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दादर पश्चिममधल्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेला महापालिकेने 1969 मध्ये विनाअनुदानित शाळा म्हणून मान्यता दिली. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या 12 तुकड्यांना कायम अनुदानित तत्त्वावर 1 जून 2015 ते 31 मे 2020 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे.
फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या नामकरणाच्या ठरावाला मंजुरी दिली होती. तसंच मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडूनही या नामकरणास मंजुरी मिळाली. त्यानंतर व्यवस्थापनाने नामकरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीसमोर सादर केला. पण शिक्षण समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर शाळेचं नाव बदलण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शारदाश्रम शाळा ही दादरची एक ओळख आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांसारखे क्रिकेटर या शाळेने घडवले आहेत. या जोडगळीने शालेय क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम शाळेकडूनच खेळताना 664 धावांची भागीदारी करुन विश्वविक्रम रचला होता.
फक्त क्रिकेटच नाही तर विविध क्षेत्रांमध्ये शाळेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्यामुळे शाळेचं नाव बदलू नये, अशी मागणी करत दादरच्या रहिवाशांनी नामकरणाला विरोध केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)