मुंबईच्या बोरीवलीत पब्लिक ब्रीजला मोठी आग, अग्निशमन दलाचा 2 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या बोरीवली पाश्चिमेत स्टेशन बाहेर पब्लिक ब्रीजमध्ये मोठी आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बोरिवली पश्चिम स्टेशनबाहेर स्काय वॉकमध्ये ही आग लागली आहे.

Mumbai Fire : मुंबईच्या बोरीवली ( Borivali) पाश्चिमेत स्टेशन बाहेर पब्लिक ब्रीजमध्ये मोठी आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बोरिवली पश्चिम स्टेशनबाहेर स्काय वॉकमध्ये ही मोठी आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
स्काय वॉकमधून आग खाली पडत असल्यामुळं सध्या पोलिसांनी वाहतुकीसाठी पब्लिक ब्रीज बंद केला आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, या संदर्भात अधिक तपास बोरिवली पोलीस आणि अग्निशमाक दलाचे जवान करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Hyderabad Fire: हैदराबादमध्ये अग्नितांडव, चारमिनारजवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू


















