एक्स्प्लोर

महाविकास आघाडीची तीन तास बैठक, एकत्र पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाला उत्तर देणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद चार वाजता होणार आहे. या परिषदेला मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब एकत्र असणार आहेत.

मुंबई : आज महाविकास आघाडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीत कोरोना, लॉकडाऊनसह महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद चार वाजता होणार आहे. या परिषदेला मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब एकत्र असणार आहेत. आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि अनिल परब उपस्थित होते. कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारसोबत, राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांना फोन या बैठकीत मुंबईवर चर्चा झाली, मुंबईला पूर्वपदावर आणण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. मुंबईच्या शाळा, दुकानं, रेल्वे हळूहळू योग्य वेळी पूर्वपदावर आणू, असं मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. मुंबईतली परिस्थिती सांगणारे सर्व व्हिडीओ हे फेक आहेत. हे सर्व व्हिडीओ दोन तीन महिन्यापूर्वीचे आहेत, असा दावा देखील अस्लम शेख यांनी केला आहे. मुंबईतली परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. विरोधी पक्षाला राजकारण करायचं करू द्या. या सरकारला कोणताही धोका नाही. कोण कोणाकडे चहा घ्यायला जातं याबाबत भाजपला राजकारण करण्याची गरज नाही. भाजपमध्ये समन्वयाचा अभाव आहे. मुंबईसाठी जे जे योग्य निर्णय आहेत ते आम्ही घेऊ. राष्ट्रपती राजवटची गरज जिकडे आहे तिकडे लावा, असं देखील शेख म्हणाले. केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केलं की ते लोकांना खरं वाटू लागतं. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केलं जातं. महाराष्ट्राला यात जास्तच मिळतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचं अन्नधान्य दिलं, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Embed widget