Sharad Pawar : शरद पवार मविआच्या सभेला संबोधित करणार, साडेबारा वाजता राहणार उपस्थित
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा मुंबईत आज महामोर्चा (Morcha) निघणार आहे. या मार्चाच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) संबोधित करणार आहे.
Sharad Pawar : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.
Sharad Pawar on State Govt : राज्य आणि केंद्र सरकारची बघ्याची भूमिका
तब्बेतीच्या कारणामुळं शरद पवार मविआच्या सभेस्थळी उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार (Sharad Pawar) हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकार (State Govt) आणि केंद्र सरकारनं (Central Government) याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली नाही. त्यांची केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळं लोकांमध्ये संताप असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार
भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रपेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या:
MVA Mumbai Morcha : आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी