एक्स्प्लोर
Advertisement
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाला भोपळा, महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाच्या हाती भोपळा लागला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारत कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. 18 पैकी 16 संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. तर दुसरीकडे भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सर्वच महसूल विभागात भाजपाचा पराभव होत असताना नागपूर मधील बालेकिल्ल्यातही भाजपाला आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. यामुळे भाजपाच्या हाती भोपळा लागला असून महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची उमेद वाढवणारा निकाल ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपाने ताकद लावली होती. बाजार समितीवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजपाने केला . मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आले. शिवसेनेला बरोबर घेत राष्ट्रवादीने बाजार समिती निवडणुकीची मोट बांधत भाजपाला कात्रजचा घाट दाखवला आहे.
18 संचालकापैकी 12 संचालक शेतकरी प्रतिनिधी, पाच संचालक व्यापारी प्रतिनिधी, 1 संचालक कामगार प्रतिनिधी असणार आहे. सभापती पद हे कायद्याने शेतकरी प्रतिनिधीलाच भूषविता येते. सहा वर्षानंतर मुंबई बाजार समितीवर संचालक मंडळांची नियुक्ती झाल्याने शेतकरी वर्गाला न्याय मिळेल अशी आशा आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडून मुंबई बाजार समितीत पाठविण्यात येणाऱ्या शेतमालाला योग्य भाव देणे, त्याच्या मालाचे संरक्षण करणे, व्हेअरहाऊस उभा करून नाशवंत मालाचा दर्जा राखण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करील अशा आशा आहे.
विभागवार विजयी उमेदवार खालील प्रमाणे
पुणे विभाग -
1) बाळासाहेब सोळस्कर - राष्ट्रवादी कॉंग्रेस
2) धनंजय वाडकर - काँग्रेस
कोकण विभाग -
1) राजेंद्र पाटील - शेकाप
2) प्रभाकर पाटील - अपक्ष ( शिवसेना बंडखोर )
नाशिक विभाग -
1) अद्वैत हिरे - अपक्ष
2) जयदत्त होळकर - राष्ट्रवादी कॉंग्रेस
औरंगाबाद विभाग -
1) अशोक डक - राष्ट्रवादी कॉंग्रेस
2) वैजनाथ शिंदे - काँग्रेस
अमरावती विभाग -
1) प्रविण देशमुख - काँग्रेस
2) माधवराव जाधव - शिवसेना
नागपूर विभाग -
1) सुधीर कोठारी - राष्ट्रवादी काँग्रेस
2) हुकूमचंद आमधरे - काँग्रेस पक्ष
वाशी बाजार समिती
1) फळ मार्केट - संजय पानसरे
2) भाजीपाला मार्केट -शंकर पिंगळे
3) कांदा बटाटा मार्केट -अशोक वाळूंज
4) दाणा मार्केट - निलेश विरा
5) मसाला मार्केट - विजय भूता
कामगार प्रतिनिधी -
शशिकांत शिंदे - बिनविरोध
APMC Market Election | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा आज निकाल
संबंधित बातम्या :
नगरमधील शेतकऱ्यांची एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक
डाळी शंभरी पार, पावसाचा फटका बसल्याने येत्या काळात डाळींच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement