एक्स्प्लोर
CCTV : महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर चिमुरडी थोडक्यात बचावली!
जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं.

मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवनर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत एका पाच वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. सीसीटीव्हीत ही थरारक दृश्यं कैद झाली आहेत. शुक्रवारी 11 तारखेला सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली.
भिवंडीतील मोहम्मद दिलशान यांचं कुटुंब धावत्या रेल्वेत चढत होतं. ट्रेननं वेग घेतल्यानं इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळी ट्रेनमध्ये चढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं. पाहा व्हिडीओ :
भिवंडीतील मोहम्मद दिलशान यांचं कुटुंब धावत्या रेल्वेत चढत होतं. ट्रेननं वेग घेतल्यानं इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळी ट्रेनमध्ये चढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं. पाहा व्हिडीओ : आणखी वाचा























