Mumbai Traffic : आजचा दिवस मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार? 'या' भागात साचलं पाणी, मुंबई वाहतूक विभागाची माहिती
Mumbai Traffic : मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचलं असुन अनेक मार्गावर वाहतूक मंदावली आहे. दरम्यान, मुंबई वाहतूक विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
Mumbai Traffic : रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचलं असुन अनेक मार्गावर वाहतूक (Traffic Jam) मंदावली आहे. दरम्यान, मुंबई वाहतूक (Mumbai Traffic) विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. भोईवाडा, वाळकेश्वर, अंधेरी सबवे या परिसरात पावसाचे पाणी साचले असल्याची माहिती मुंबई ट्राफिक विभागाकडून देण्यात आली आहे.
सरदार हॉटेल (भोईवाडा) येथे १.०५ फूट पाणी साचले. वाहतूक मंदावली आहे.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 8, 2022
1.05 feet of water logging at At Sardar Hotel (Bhoiwada). has slowed down the traffic.#MTPTrafficUpdate#MumbaiRains #MumbaiMonsoon
सरदार हॉटेल (भोईवाडा) येथे 1.05 फूट पाणी साचले. वाहतूक मंदावली आहे.
सिरी रोड पेट्रोल पंपाजवळ वाळकेश्वर रस्त्यावर 1.05 फूट पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 8, 2022
1.05 feet of water logging at Walkeshwar road near Siri road petrol pump.. has slowed down the traffic.#MTPTrafficUpdate#MumbaiRains #MumbaiMonsoon
सिरी रोड पेट्रोल पंपाजवळ वाळकेश्वर रस्त्यावर 1.05 फूट पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.
अंधेरी सबवे येथे २ फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 8, 2022
2.0 feet water logging at Andheri subway. has slowed down the traffic.#MTPTrafficUpdate#MumbaiRains #MumbaiMonsoon
अंधेरी सबवे येथे 2 फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे.
आजचा दिवस मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार?
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांचे हळूहळू नद्यांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी साचले असून सततच्या पावसामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ हिंदमाता संकुलच नाही तर मुंबईत असे अनेक सखल भाग आहेत. जिथे पाणी साचले आहे. हिंदमाता, अंधेरी या सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाची संततधार सुरू राहिल्यास आजचा शनिवार हा मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरू शकतो.
संबंधित बातम्या