एक्स्प्लोर

Maharashtra Politics : ठाकरेंच्या खासदाराच्या अडचणी वाढणार? संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मोठं कारण आलं समोर

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना-पाटील निवडून आलेत. पण, आता त्यांना खासदारकी गमवावी लागतेय की, काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

Maharashtra Politics : मुंबई : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले. एक लोकसभा मतदारसंघ अगदी ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातून थोडक्यात निसटला. मुंबईतील (Mumbai Election) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल किर्तीकर (Amol Gajanan Kirtikar), तर शिंदेंकडून रवींद्र वायकर (Ravindra Waikar) अशी लढत होती, अगदी चुरशीच्या निकालात शिंदेंनी मतदारसंघ बळकावला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. अशातच आता ठाकरेंच्या निवडून आलेल्या खासदाराच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या खासदारकीला हायकोर्टात (High Court) आव्हान देण्यात आलं आहे. 

निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे. 

शहाजी थोरात यांनी संजय दिना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. याप्रकरणी मिहीर कोटेंचा यांच्यासह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना-पाटील निवडून आले. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठानं या निवडणूक याचिकेची दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅक्सी चालक असलेले आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार शहाजी थोरात यांनी निवडणूक याचिकेद्वारे पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचं नाव नमूद करणं अनिवार्य आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईचं नाव नमूद केलं नव्हतं. नियमानुसार, या कारणास्तव पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरतो. त्यामुळे, त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29 हजार 800 मतांच्या फरकानं पराभव केला होता. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. उद्धव ठाकरे गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29,800 मतांच्या फरकानं पराभव केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 24 January 2025Job Majha : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता काय?Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभ मेळ्यामध्ये स्वीकारली संन्यासाची दीक्षा100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
Embed widget