एक्स्प्लोर

Deepali Sayyad: दीपाली सय्यद शिंदे गटात; निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर, रश्मी ठाकरेंवरही सडकून टीका

Deepali Sayyad: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे मनोमिलन करण्याची घोषणा करणाऱ्या दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी रश्मी ठाकरेंवर सडकून टीका केली.

Deepali Sayyad:  उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी आज शिंदे गटात प्रवेश (Eknath Shinde Faction) करण्याचे संकेत दिले. वर्षा बंगल्याबाहेर माध्यमांशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe), सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) दीपाली सय्यद यांनी टीका केली. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नसल्याची खंत रश्मी वहिंनीना असल्याचे टीकास्त्र दीपाली यांनी सोडले.

दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दीपाली सय्यद यांच्याकडून शिवसेनेच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यात येत होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणले होते. त्यामुळे आता त्यांना साथ देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दीपाली सय्यद यांना 33,644 मते मिळाली होती. तर, जितेंद्र आव्हाड यांना 1,09,283 मते मिळाली होती.

बीएमसीचे खोके नसल्याने रश्मी ठाकरेंना खंत

यावेळी दीपाली सय्यद यांनी नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे हे चिल्लर आहेत. खोक्यामागील  सूत्रधार रश्मी ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत. याची खंत रश्मी वहिनींना जाणवत असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले. 

राऊतांनी तोंडाने पक्ष फोडला 

दीपाली सय्यद यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तोंडाने पक्ष कसा फोडायचा याचे उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत.  संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत असल्याची टीका दीपाली सय्यद यांनी केली. 

पाहा व्हिडिओ: BMC तील खोके मातोश्रीला येणं बंद झाल्याचं रश्मी ठाकरेंना दुःख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget