Congress : अल्पसंख्याकांसाठी मुंबईत एक जागा द्यावी, अस्लम शेख यांची मागणी, लोकसभेच्या उमेदवारीसाठी कॉंग्रस नेत्यांमध्ये रस्सीखेच
Congress : मुंबईतून लोकसभेसाठी कांग्रेस नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. माजी मंत्री अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी लोकसभेसाठी केली मागणी
Congress : मुंबई मधून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी कॉंग्रस नेत्यांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू झालेली आहे. अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि अमीन पटेल (Amin Paten) यांनी लोकसभेसाठी मागणी केलीय. अल्पसंख्याकांसाठी मुंबईत एक जागा द्यावी असा आग्रह अस्लम शेख यांनी केला आहे. प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडे शेख यांनी मागणी केली आहे. यावर आता महाविकास आघाडी काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'आम्हा दोघांची तयारी आहे' - अस्लम शेख
याबाबत अस्लम शेख यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे, त्यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये कॉंग्रेसने तीन जागा मागितल्या आहेत, तीन पैकी जर कॉंग्रेस पक्षाने निर्णय घेतला की, अल्पसंख्याकांसाठी एक जागा द्यायची आहे. तर दोन आमदार म्हणजेच स्व:त अस्लम शेख आणि अमीन पटेल या दोघांपैकी कोणालाही दिली तरी आमची तयारी आहे, असं शेख म्हणाले.
..आणि अस्लम शेख यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते.
काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर आणखी काही आमदारांचीही नावे जोडली जात होती. त्यामध्ये अस्लम शेख यांचाही समावेश असल्याचं बोललं जात होतं. अशोक चव्हाणांसह मालाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र या वृत्तावरून अस्लम शेख यांनी 'मी काँग्रेस पक्ष सोडला नाही. मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, माझ्या अन्य पक्षात जाण्याबाबत खोट्या बातम्या पसरवू नका. थोडी सभ्यता पाळूया आणि अनावश्यक गोंधळ निर्माण करणे टाळूया" अशी पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं.
539 लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची यादी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 539 लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशासह राज्यातील 48 जागांचा समावेश आहे. तर जबाबदारी देण्यात आलेले समन्वयक आपापल्या लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे आकलन करतील आणि इंडिया आघाडीतील जागा वाटप चर्चेसाठी पक्ष नेतृत्वाला अभिप्राय देतील. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले होते की, पक्ष किती जागा लढवायचा हे ठरवेल, परंतु पक्षाने सर्व 5000 हून अधिक मतदारसंघात निरीक्षक निश्चित केले आहेत.
हेही वाचा>>>
Amit DeshMukh : अशोक चव्हाणांसोबत भाजपवासी होण्याची चर्चा, बैठकीला दांडी; समोर येताच अमित देशमुख म्हणाले...