एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis :  "आता कसं वाटतंय"!! पोस्टर लावत मनसेनं शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता मनसेनेकडूनही शिवसेनेवर घाव सुरु झाले आहेत. मनसेनं शिवसेनेकडे बोट दाखवत "आता कसं वाटतंय", असा सवाल केला आहे. हे पोस्टर मुंबईतील साकीनाका परिसरात लावण्यात आले आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही शिवसेनेवर घाव सुरु झाले आहेत. मनसेनं पोस्टर लावून शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यात शिवसेनेकडे बोट दाखवत "आता कसं वाटतंय", असा सवाल केला आहे. मनसेचे हे पोस्टर मुंबईतील साकीनाका परिसरात लावण्यात आले आहे. अजान वादातही राज ठाकरे उघडपणे उद्धव ठाकरे सरकारसमोर उभे ठाकले होते. त्यांनी सर्व मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता.

अलीकडच्या काळात अनेक मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. यात अजान वादाचा मुद्दा सर्वात ठळक राहिला.

एक काळ असा होता की राज ठाकरेंकडे शिवसेनेचे भावी नेते म्हणून पाहिले जायचे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक चमकता तारा होते. लोकांना त्यांच्यामध्ये बाळ ठाकरेंची प्रतिमा दिसायची. त्यामुळे ते शिवसैनिकांच्या पसंतीस उतरले. मात्र, शिवसेनेला उत्तराधिकारी म्हणून बाळासाहेबांनी उद्धव यांना प्राधान्य दिले.

त्यानंतर झालेल्या अनेक घडामोडीनंतर राज यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले. जानेवारी 2006 मध्ये शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मार्च 2006 मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) असे नाव दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवसेना समर्थकही गेले होते. 

शिवसेनेतील बंडखोरीमुळे आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या पायाखालची जमीनच सरकवली आहे. सर्व पर्यायांचा वापर करूनही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना ते आपल्या छावणीत आणू शकलेले नाहीत.

शिंदे यांच्या तुलनेत ते संख्याबळात पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सरकारच्या भवितव्याबाबत अटकळ सुरू झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
वर्षाताई माझं मत तुलाच, पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल, खासदार करुन दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
OTT Web Series Thriller Web Series : 'मिर्झापूर 3' च्या रिलीज आधी ओटीटीवर पाहा या वेब सीरिज; ट्विस्ट पाहून हैराण व्हाल!
'मिर्झापूर 3' च्या रिलीज आधी ओटीटीवर पाहा या वेब सीरिज; ट्विस्ट पाहून हैराण व्हाल!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Parbhani Lok Sabha : परभणीत बनावट मतदान, आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचा आरोपUddhav Thackeray Full Speech : माझं मत वर्षा गायकवाडांना : उद्धव ठाकरे  : ABP MajhaAbhijeet Patil : अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल साखर कारखान्यावरील साखर साठा जप्तVare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 2 PM : 26 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
वर्षाताई माझं मत तुलाच, पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल, खासदार करुन दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
OTT Web Series Thriller Web Series : 'मिर्झापूर 3' च्या रिलीज आधी ओटीटीवर पाहा या वेब सीरिज; ट्विस्ट पाहून हैराण व्हाल!
'मिर्झापूर 3' च्या रिलीज आधी ओटीटीवर पाहा या वेब सीरिज; ट्विस्ट पाहून हैराण व्हाल!
Hemant Godse : एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
Nilesh Lanke : अहमदनगरमधून आता दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; सुजय विखेंवर महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
अहमदनगरमधून आता दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; सुजय विखेंवर महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
Embed widget