Uddhav Thackeray : जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची एक बैठक घेतली.

मुंबई: आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करु नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना म्हणाले. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा असे आदेशही उद्धव ठाकरेंनी विभागप्रमुखांना दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवली होती. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी खालील आदेश दिले आहेत,
- आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही काम आहोत
- जे गेले त्याचा विचार करू नका.
- आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे.
- विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा.
- त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल.
संजय राऊत यांचे बंडखोरांना आवाहन
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले. चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्वीट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केले आहे.
दरम्यान, पक्षाविरोधात बंड केलेल्या 12 आमदारांच्या विरोधात कारवाई करा, त्याचं सदस्यत्व रद्द करा अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलं आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली असून पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलं आहे.
सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस असलेल्या यादीतील नावं
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
