एक्स्प्लोर

Palghar Corona | पालघर जिल्ह्याचे व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला, स्थानिकांमध्ये संताप

व्हेंटिलेटर अभावी पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असतानाही जिल्ह्यासाठी असलेले व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याने कशी काय पळवली असा प्रश्न विचारला जात आहे.

पालघर : संपूर्ण पालघर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्यांना जीव गमवावा लागत आहे. परंतु असं असूनही पालघरसाठी असलेले दहा व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी असलेले व्हेंटिलेटर ठाणे का दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेने मृत्यूदर वाढत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली असून जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना वणवण करावी लागत आहे. परिणामी या रुग्णांना जिल्ह्याबाहेर हलवल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्ण जिल्ह्याबाहेरची वाट धरत आहेत. पालघर जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर वाढवण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत असून जिल्हा प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे. परिणामी जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. व्हेंटिलेटर अभावी वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असताना सुद्धा जिल्ह्यासाठी असलेले व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याने कशी काय पळवली असा प्रश्न विचारला जात आहे.

वसई विरार हा शहरी भाग असो की पालघर जिल्ह्याचा ग्रामीण भाग संपूर्णपणे सगळा जिल्हा कोरोनाने वेढला आहे. या संपूर्ण पट्ट्यात मृत्यू दरामध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना प्रशासनाने ठाणे जिल्ह्याचाही विचार करायला हवा यात दुमत नाही. पण पालघर जिल्ह्यात व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात बेड शोधावे लागत आहेत अथवा आपला जीव गमवावा लागत आहे. असे असताना आधीच जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या कमी असताना ठाणे जिल्ह्याला का पाठवण्यात आली या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? निष्पाप लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे असताना कोणाच्या दबावाखाली आरोग्य यंत्रणेने आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 89 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील हे 10 व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला का देण्यात आली किंवा राजकीय दबावापोटी देण्यात आली का याबाबत सांशकता आहे.

प्रशासनाने जर व्हेंटिलेटर ठाण्याला दिली असतील तर ते चुकीचे आहे आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. आपल्या इथल्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असताना दुसऱ्यांना देणे हे अत्यंत गैर आहे, अशी प्रतिक्रिया पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.

तर आपण ठाणे जिल्ह्याचा दुसरी काही मदत केली नाही. वरिष्ठांनी आदेश दिले म्हणून व्हेंटिलेटर पाठवावी लागली, असं पालघरचे उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावाST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Embed widget