एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shivsena: ...तर, तुम्हाला जुनी शिवसेना दाखवून देऊ; शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा इशारा

Shivsena Prabhadevi Rada: गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

Shivsena Prabhadevi Rada: सत्ताधाऱ्यांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि शिवसैनिकांविरोधातील कलम 395 नुसार गु्न्हे मागे घेईपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. सरकारची गुंडगिरी सुरू राहिल्यास जुनी शिवसेना दाखवून देऊ असा इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. प्रभादेवीमध्ये मध्यरात्री शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. त्यानंतर शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सावंत यांनी केली. 

गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली. पहाटेपर्यंत दादर पोलीस स्टेशनबाहेर तणावाची स्थिती होती. पोलिसांनी शिंदे गटाच्या तक्रारीनंतर  महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना अटक केली. त्यानंतर आज सकाळपासून शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस स्टेशनबाहेर जमू लागले. शिंदे गटाविरोधात आणि गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात का आला नाही, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केला. अरविंद सावंत यांच्यासह दादर पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, आमदार अॅड. अनिल परब, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य यांनी धाव घेतली. 

माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, आमदार सदा सरवणकर यांच्याकडील पिस्तूलमधून गोळीबार झाला. मात्र, 'चोराच्या उलट्या बोंबा' या म्हणी प्रमाणे तक्रार दाखल करायला आलेल्या आमच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले. सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही. गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. शिवसैनिकांविरोधात दाखल करण्यात आलेला 395 अंतर्गत गुन्हा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांवर दबाव असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्ताधारी कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत

राज्यकर्ते असलेल्या लोकांकडून चुन चुन के मारेंगेची धमकी दिली जाते, विरोधकांना संपवण्याची भाषा केली जाते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप सावंत यांनी केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिक शांत आहेत. राज्यातील वातावरण बिघडू नये आम्हाला वाटते. मात्र, ही गुंडागर्दी सुरू राहिल्यास आम्ही जुनी शिवसेना काय आहे, ते दाखवून देऊ असा इशाराही सावंत यांनी दिला. आमदार सदा सरवणकर यांनी प्रभादेवी आणि दादर पोलीस ठाणे परिसरात गोळीबार केला असल्याची जबाब पोलिसांने दिला आहे. मात्र, त्यानंतरही कारवाई नाही. गृहमंत्री नेमकं काय करत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget