Kranti Redkar : तीन जणांकडून आमच्या घराची रेकी, कुटुंबाला धोका; क्रांती रेडकर-वानखेडे यांनी मागितली सुरक्षा
Kranti Redkar : काही लोकांनी तीन दिवसांपूर्वी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्ही यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहोत, असा दावा क्रांती रेडकर-वानखेडे यांनी केला आहे.
Maharashtra News : मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांचे पती समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांनी तीन दिवसांपूर्वी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्ही यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहोत. तसेच, आमच्या कुटुंबाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं आहे, अशी मागणीही क्रांती रेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना केली.
क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून सातत्यानं होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच मलिकांनी दावा केला होता की, समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मराठी नसून मुस्लिम आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर केली. दरम्यान, नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले.
2017 मध्ये समीर वानखेडेंशी लग्न करणाऱ्या क्रांती रेडकरनं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देत म्हटलं होतं की, नवाब मलिक त्यांच्या पतीविरोधात खोटे आरोप लावून अत्यंत खालच्या स्तरावर राजकारण करत आहेत.
समीर वानखेडे प्रकरणात रामदास आठवलेंची एन्ट्री, म्हणाले, 'पिक्चर में मेरा रोल अभी बाकी'!
मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. समीर वानखेडे यांच्यावर बोगस जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिकांच्या आरोपांची मालिका सुरु असतानाच समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं. समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही, आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे, असं अश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिलं. नवाब मलिक म्हणतात पिक्चर अजून बाकी आहे. पण या पिक्चरमध्ये माझा रोल बाकी आहे, असं रामदास आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले.
नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. क्रांती रेडकर यांनी मला सर्व कागदपत्रं दाखवली. कागदपत्र अधिकृत आहेत. वानखेडे कुटुंबीय बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत. समीर वानखेडेंविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. जर तुमचे काही आरोप असतील तर कोर्टात जा. जावयावरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप करण्यात येत आहेत. मलिकांसाठी आमच्याकडे वेळ नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
आर्यन खान याने ड्रग्स घेतले नव्हते तर मग कोर्टाने 22 दिवस जमीन का दिला नाही? असा सवाल यावेळी नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तसेच पंच प्रभाकर साईल याला पैसे देऊन वानखेडेंविरोधात उभं केल्याचा आमचा आरोप असल्याचं आठवले म्हणाले. समीर वानखेडे यांची बाजू घेताना आठवले म्हणाले की, समीर वानखेडे यांच्याविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातेय. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. समीर वानखेडे यांना पैसे घ्यायचे असते तर मग त्यानी 19 जणांना अटक केली नसती. समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही, आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे. नवाब मलिक म्हणतात, यांना भेटणं योग्य नाही त्यांना मला सांगयच की माझं भाग्य आहे की हे सगळे माझ्याकडे आलेत. नवाब मलिक जरी माझ्या घरी आले त्याना सुद्धा मी भेटेल असं आठवले यांनी यावेळी सांगितलं.