एक्स्प्लोर

Mumbai : तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने केलेली 10 टक्के पाणी कपात रद्द

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात येत आहे.

मुंबई : सन 2022 च्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 27 जून 2022 पासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आज (दिनांक 8 जुलै 2022) पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात येत आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत 27 जून 2022 रोजी 1 लाख 31 हजार 770 दशलक्ष लिटर म्हणजेच 9.10 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज 3 लाख 75 हजार 514 दशलक्ष लिटर  म्हणजे 25.94 टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

मात्र, आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने महानगरपालिकेतर्फे लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवातLonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ताTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget