![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणी गडावरुन पडली, पाच तासांनी मृतदेह बाहेर काढला!
गडावर सेल्फी काढताना तोल जाऊन खोल दरीत पडल्याने 17 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दामिनी ज्ञानेश्वर दिनकरराव असं या तरुणीचं नाव असून मुरबाडच्या गोरखगडावर हा प्रकार घडला.
![सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणी गडावरुन पडली, पाच तासांनी मृतदेह बाहेर काढला! Maharashtra murbad news 17 years old girl fell from the fort while taking a selfie, body taken out after five hours सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणी गडावरुन पडली, पाच तासांनी मृतदेह बाहेर काढला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/07/e3472e787de21581689f605a6dcd317f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुरबाड : उंचावर किंवा टेकडीवर जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा घटनांमधून कोणताही बोध न घेत अनेकदा तरुणाई बिनधास्तपणे स्टंटबाजी करत टोकावर जाऊन फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणतीही काळजी न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ त्यांच्यावर येते. असाच प्रकार मुंबईजवळच्या मुरबाडमध्ये घडला आहे. गडावर सेल्फी काढताना तोल जाऊन खोल दरीत पडल्याने 17 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दामिनी ज्ञानेश्वर दिनकरराव असं या तरुणीचं नाव असून मुरबाडच्या गोरखगडावर हा प्रकार घडला.
दामिनी दिनकरराव ही शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावाची रहिवासी होती. ती बुधवारी (6 एप्रिल) दुपारी काही मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर गेली होती. त्यावेळी गडावरील एका ठिकाणी ती मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढत होती. त्याचवेळी दरीच्या कडेला उभी असताना तोल जाऊन ती गडावरुन थेट दरीत पडली. घटनेची माहिती मिळताच सह्यागिरी ट्रेकर संस्थेच्या मदतीने तिचा मृतदेह पाच तासानंतर बाहेर काढण्यात यश आलं. मात्र यात पोलीस आणि अग्निशमन दलाने काहीच मदत केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अंधारामुळे ट्रेकर्सना तरुणीचा मृतदहे बाहेर काढण्याच्या कामात अडथळे येत होते. मात्र गावकरी आणि इतर लोकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आता मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
बीडमध्ये सेल्फीच्या नादात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी बीडमध्येही असाच प्रकार घडला होता. बंधाऱ्यानजिक सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तीन जण नदीत पडले आणि खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना बीडमधील वडवणी तालुक्यातील कवडगाव इथे घडली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेने वडवणी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एका खाजगी उर्दू शाळेमध्ये शिक्षक असणाऱ्या शिक्षकाच्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी, जावई आणि जावयाचा मित्र सासरवाडीमध्ये आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर चारच्या सुमारास ते फिरण्यासाठी बाहेर पडले. समोर असलेल्या नदीच्या पाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मुलगी, जावई, जावयाचा मित्र आणि नात्यातील दोन लहान मुले हे नदीच्या पात्रात सेल्फी काढत असताना तोल गेला. नदीमध्ये वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)