विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊची अखेर जेलमधून सुटका
युट्यूबर - व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे.
मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर - व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनप्रकरणी अटक झाली होती.
राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विनंती पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यासाठी जात असल्याचं भाऊन जाहीर केलं. आणि त्यासाठी त्यानं एक व्हिडीओ संदेश जारी करत तमाम मुलांनाही तिथं हजर राहण्यास सांगितलं. सोशल मीडिया स्टार असलेस्या भाऊच्या या हाकेला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत युट्यूबर - व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला अटक केली होती. त्यांतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून अधिकची चौकशी आणि तपास आवश्यक असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून न्यायालयात केला आणि त्यांनी भाऊच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
- अटकेत असलेल्या 'हिंदुस्थानी भाऊ'च्या नावाने आणखी एक मेसेज व्हायरल, वकील म्हणतात...
- हिंदुस्थानी भाऊ भाजपच्या आयटी सेलचं प्रॉडक्ट; सचिन सावंत यांचा आरोप
- चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
- Student Protest: रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मी का घेऊ? राज्य सरकार याला जबाबदार: हिंदुस्थानी भाऊ